मागच्या वर्षी पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.
पुण्याच्या इतिहासतील काळी रात्र

- पेशवाईच्याही पूर्वीपासून अस्तित्त्व असलेला हा आेढा कधी तरी पुणेकरांच्या डोळ्यात पाणी आणेल, असे वाटले नव्हते.पण...
- एका रात्रीच्या तुफान पावसाने कहर आणला आणि पुण्याच्या दक्षिण भागात अक्षरशः पूरच आला. त्यात विविध भागांत 13 जणांना जीव गमवावा लागला अन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.

- पावसामुळे झालेल्या जिवीत आणि वित्तहानीने पुणे पहिल्यांदाच सुन्न झाले.
गेल्यावर्षी पुण्यात पाऊस खूप झाला होता. शहरात 20-22 सप्टेंबरपासून पाऊस सुरू होता. 23 सप्टेंबरलाही पाऊस होताच. मात्र, 25 सप्टेंबरला संध्याकाळी साडेसात- आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे दोन-अडीच वाजेपर्यंत सुरू होता. ढगफुटीसदृश्य पाऊस होता.
सततच्या पावसाने आंबिल आेढ्याला अगोदरच पूर आलेला होता. त्यात त्या रात्रीची भर पडली. कात्रज तलावही भरून वाहतच होता.
परिणामी आंबिल आेढा कोपला अन नागरिकांवर संकट कोसळले.
पद्मावती आेलांडल्यावर आेढ्याचे पाणी ट्रेझर पार्क आणि लगतच्या सोसायट्यांमध्ये शिरले. त्यात हजारो वाहने पाण्याखाली गेली.
-पुढे काही अंतरावर तर, टांगेवाला कॉलनीत कहरच झाला. पाऊस, पूर यामुळे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
#PuneRain #Flood #Trending

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.